पहारेकऱ्यामुळे वाचले एटीएमधील लाखो रुपये  

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद - बीड बायपास परिसरात एटीएम मशीन पळविल्याची घटना घडल्यानंतर चोवीस तासांतच चोरांनी पुन्हा छावणी परिसरातील एक एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न केला; परंतु मशीन गॅस कटरने कापताना आवाज झाला आणि इमारतीच्या ज्येष्ठ पहारेकऱ्याला ही बाब समजताच त्यांनी चोरांना हुसकावून लावण्यासाठी दगड फेकले; परंतु चोरांनी त्यांच्यावर दगडाचा वर्षाव करीत पळ काढला. ही घटना मिसबाह कॉलनी, छावणी परिसर येथे रविवारी (ता.14) पहाटे साडेतीन ते पावणेचारदरम्यान घडली. 

मिसबाह कॉलनीत एका वाहनातून पहाटेच्या सुमारास पाच चोर आले. त्यापैकी दोघे मिसबाह कॉलनीतील एसबीआयच्या एटीएम केंद्रात गेले. गॅस कटरने मशीन तोडताना आवाज झाला. यामुळे इमारतीचे पहारेकरी शेख समद अहेमद धावत आले. चोरटे एटीएम केंद्रात शिरल्याचे पाहून शेख समद यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी काही नागरिकांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतरही वेळेवर कुणी येत नसल्याचे पाहून शेख समद यांनी चोरांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत चोरांनी उलटदिशेने दगडफेक केली. लोक गोळा होऊन पकडले जाऊ नये म्हणून चोर घटनास्थळाहून पसार झाले. 
  
सीसीटीव्हीची कापली वायर 
आत प्रवेश करण्यापूर्वी चोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. त्यानंतर एटीएममधील काही वायरही तोडल्या; पण चोरांपासून वाचलेल्या एका कॅमेरात दोन ते तीन जण तोंडाला मास्क लावून आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले; तसेच त्यांच्या हालचालीही सीसीटीव्हीत टिपल्या गेल्या. हे फुटेज चोरांनी हस्तगत केले. 
  
पोलिसांसमोरूनच गेले चोर 
शेख समद यांनी दगडफेक केल्यानंतर चोर पळाले. त्यादरम्यानच तेथून गस्त घालणारी पोलिसांचे वाहन जात होते. त्या वाहनाला शेख समद यांनी हात दाखवून थांबवीत घडलेला प्रकार व वाहनाचे वर्णन सांगितले. तेव्हा आपल्यासमोरूनच ते वाहन गेल्याची पोलिसांना लक्षात आले. त्यांनी ही बाब शेख समद यांना सांगितली.  

नेमके काय झाले? 

  • पांढऱ्या रंगाच्या तवेरा वाहनातून रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच चोरटे एका वाहनातून आले. 
  • एसबीआय बॅंकेच्या एटीएम केंद्राला त्यांनी लक्ष्य केले. 
  • पाचपैकी दोघांनी आत शिरकाव करून एटीएम मशीन गॅसकटरने फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. 
  • एटीएम फोडताना कुणाला खबर लागू नये म्हणून तिसऱ्याने दरवाजावर चादर धरली होती. 
  • चौथा बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवून होता. 
  • पाचवा चारचाकी वाहन सुरू ठेवून पळण्यासाठी तयारीत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com