जालन्यात एटीएमच्या सुरक्षेची पोलिसांनाच काळजी 

जालना : रात्री बॅंकांना भेटी देताना पोलिस कर्मचारी.
जालना : रात्री बॅंकांना भेटी देताना पोलिस कर्मचारी.

जालना - शहरातील अनेक बॅंका आणि एटीएम सेंटरवर रात्री सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाकडून बॅंक व्यवस्थापकांच्या बैठका आणि पत्रव्यवहार करून देखील बॅंकांकडून सुरक्षारक्षक नेमण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. परिणामी एटीएमच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून एटीएम सेंटरवर नोंद वही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बॅंकांच्या एटीएमच्या सुरक्षेची बॅंकांपेक्षा पोलिसांनाच काळजी असल्याचे चित्र आहे. 

शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्‍न मध्यंतरीच्या काळात ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षकच नाही. त्यामुळे एटीएमच्या तोडफोडीसह एटीएम मशीन पळविण्यापर्यंतच्या घटना शहरात घडल्या आहेत. तसेच शहरातील अनेक बॅंकांनी देखील रात्रीच्या वेळी बॅंकेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमलेले नाही.

शहरात बॅंक फोडी करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनाही घडल्या. त्यानंतर पोलिस प्रशासनाने बॅंक, पतसंस्था, पोस्ट ऑफिस आदी वित्तीय संस्थांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या; तसेच सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला; मात्र बॅंकांनी पोलिसांच्या या सूचनेकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान शहरातील एटीएमच्या सुरक्षेसाठी भेट नोंदवही ठेवली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम सेंटरवर पोलिसांकडून भेट देऊन त्या नोंदवहीवर स्वाक्षरी केल्यानंतर भेटीचा फोटो काढून व्हॉट्‌सऍप ग्रुपवर टाकत आहेत. त्यामुळे बॅंकांना त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेचे काहीच घेणे-देणे नसले तरी पोलिसांना 
काळजी करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

बॅंकांच्या एटीएममध्ये जनतेचे पैसे आहेत. त्याच्या सुरक्षेसाठी रात्र गस्तीदरम्यान एटीएमवर भेट नोंदवही ठेवली आहे. रात्र गस्तीवरील पोलिस अधिकारी, कर्मचारी येथे भेट देऊन वहीत नोंद करतात. एटीएमवरील सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भात पुन्हा बॅंक व्यवस्थापकांची बैठक घेणार येणार आहे. 
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com