रस्त्यात आडवे आले, बीएमडब्ल्यू फोडून गेले : Video

मनोज साखरे
Thursday, 21 November 2019

औरंगाबाद : भर रस्त्यात दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी कारला अडवून रॉड, दगडांचा वर्षाव केला. ही घटना जालना रस्त्यावरील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर गुरुवारी (ता. 21) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

औरंगाबाद : भर रस्त्यात दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी कारला अडवून रॉड, दगडांचा वर्षाव केला. ही घटना जालना रस्त्यावरील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर गुरुवारी (ता. 21) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

याबाबत पवन प्रकाश सदाशिवे (वय 31, रा. अरिहंतनगर) यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ते विमा क्षेत्रात कार्यरत आहेत बीएमडब्ल्यु कारने त्यांच्या मित्रांसोबत जालना रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी तीन ते चारजण दुचाकीवरुन त्यांच्या कारसमोर आले. त्यांनी कार अडवून शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर मोठ्या दगडांचा वर्षावच कारवर केला. त्यानंतर दुसऱ्याने रॉडने कारच्या काचा फोडल्या.

जीवघेणा हल्ला पाहुन कारमधीन पवन व त्यांचे सहकारी घाबरले. रस्त्यावर हल्ला पाहुन नागरिकांना काय झाले हे समजेना. काचा फोडल्यानंतर दुचाकीवरुन तिघे निघुन जात असताना कारचालकाने पाठलाग केला. हे पाहुन ते पुन्हा थांबले व त्यांनी परत कारवर हल्ला चढविला. यादरम्यान कारमधील एकाने आतून हल्ल्याचे छायाचित्रण सुरु केले.

Image may contain: 1 person, standing
कारवर दगडाने हल्ला करणारा तरुण

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारची काच फोडताना महाविद्यालयीन विद्यार्थीही व्हिडीओत दिसुन येत आहेत. घटनेनंतर सिडको पोलिस तिथे पोचले. त्यांनी हल्लेखोरांच्या दुचाकीचा क्रमांक मिळविला असून कारसह हल्ला झालेल्या पवन व त्यांच्या सहकाऱ्यांना ठाण्यात नेले. कार ठाण्यात लावल्यानंतर हल्लेखोरांविरुद्ध पवन यांनी तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Image may contain: 4 people, car and outdoor

कारण उमजेना.. 

याबाबत सिडको पोलिसांनी सांगितले की, कारवर हल्ला झाल्यानंतर आम्ही आतील तरुणांची चौकशी केली. मात्र हल्ला का झाला हे त्यांच्याकडून सांगण्यात आले नाही. हल्ल्याचे कारण ठोस असावे, परंतु ते आम्हाला सांगितले जात नसल्याचे पोलिस म्हणाले. संशयितांचा आम्ही शोध घेत असून त्यांच्याकडूनच हल्ल्याचे कारण कळु शकले असेही सिडको पोलिसांनी सांगितले.

कशामुळे - उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध औरंगाबादेत तक्रार दाखल

हल्ल्यामुळे दहशत 

शहरात यापुर्वी त्रिमुर्ती चौकात तलवार हल्ला चांगलाच गाजला होता. याचे सीसीटीव्ही फुटेजही नंतर प्राप्त झाले होते. त्यानंतर जालना रस्त्यावर वर्दळीत हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याने शहरवासीयांत भीती उत्पन्न झाली असून अशा टवाळखोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी नागरिकांची भावना आहे.

पहा हा थाट - निवृत्त आयजीने लावून घेतला अंबर दिवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on BMW on Jalna Road in Aurangabad