एकावर प्राणघातक हल्ला; दहा जणांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नांदेड : देण्या- घेण्याच्या कारणावरून एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एनटीसी मील परिसरात 26 आॅगस्टच्या रात्री बारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या तावडीत नसल्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.  

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनटीसी परिसरात जफरखान नझर महमद खान (वय 44) हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांचा व अन्वरअली खान, कमल यादव यांच्यासोबत देण्या- घेण्याचा व्यवहार होता. याच कारणावरून जफरखान याला त्याच्या घरी जाऊन अन्वरअली खान, कमल यादव, कमल यादवचा मेव्हणा, तुलजेश यादव, संतोष पाटील, सरबजीतसिंग संधु, सोनु महाराज, गोटू, कैलास यादव आणि विजय यादव यांनी मारहाण केली.

यामध्ये, तलवारीने जफरखान याच्या उजव्या हातावर गंभीर दुखापत केली. जखमी जफरखान याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात वरील आरोपींसह इतर वीस जणांवर प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, फौजदार मनोज पांडे, किरण पठारे यांनी भेट दिली. तपास फौजदार अमोल कडु हे करीत आहेत. 

Web Title: attack on one man Ten accused