समर्थ कारखान्याच्या संचालिकेचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

अंबड - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी तथा समर्थ कारखान्याच्या संचालिका सुमित्रा यांचा सोमवारी (ता. दोन) झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. अंबड नाक्‍यालगत असलेल्या "मोरया' या निवासस्थानी दुपारी दोनला ही खळबळजनक घटना घडली. डोक्‍याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे या दुपारी पाचोड नाक्‍यालगत असलेल्या मोरया या निवासस्थानी एकट्याच होत्या. दरम्यान, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याबाबत माहिती मिळताच त्यांचे दीर व जावेने निवासस्थानी धाव घेतली. सुमित्रा यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्या जागेवरच कोसळल्या होत्या. बाजूलाच रिव्हॉल्व्हर पडलेले होते. जखमी अवस्थेत त्यांना जालना येथे हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. हा घातपात असल्याचीच चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जालना येथून श्‍वानपथकाला पाचारण केले. याच बरोबर बोटांच्या ठश्‍यांचा तपास करण्यात आला. त्यानंतरही पोलिसांनी हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनवणे, निरीक्षक रामेश्‍वर खनाळ, जमादार बी. जी. खंडागळे, विनायक कोकणे, संदीप कुटे, डोईफोडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी काही धागेदोरे मिळतात का, याची कसून तपासणी केली. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ठोस पुरावा पोलिसांना सापडला नाही. मृत्यूचे खरे कारण तपासाअंतीच बाहेर येईल, असे पोलिस निरीक्षक रामेश्‍वर खनाळ यांनी सांगितले. 

सुमित्रा होंडे (वय 35) यांचे मूळगाव साडेगाव (ता.अंबड) आहे. त्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या महिला संचालिका तर अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी होत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. 

Web Title: attack on satish honde wife

टॅग्स