वस्ताऱ्याने चिरला एकाचा गळा ; गंभीर अवस्थेत उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

हजूर साहिब रेल्वेस्थानक परिसरात सलून ग्राहकांवरून एका न्हाव्याने दुसऱ्या नाव्ह्याचा वस्तऱ्याने गळा चिरला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. 

नांदेड : येथील हजूर साहिब रेल्वेस्थानक परिसरात सलून ग्राहकांवरून एका न्हाव्याने दुसऱ्या नाव्ह्याचा वस्तऱ्याने गळा चिरला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. 

छोटा जानी असे जखमी न्हाव्याचे नाव असून, तो या परिसरात सलूनचे दुकान चालवितो. ग्राहकांच्या वादावरून छोटा जानी व त्याच्या शेजारील न्हाव्यात हाणामारी झाली. यात छोटा जानी याच्यावर वस्ताऱ्याने हल्ला केला. वस्ताऱ्याचा वार गळ्यावर बसल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच तेथील तिघांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Attacked with Like Knife Material treatment Continue at critical condition