बेकायदा नळ कनेक्‍शन रोखल्याने केला हल्ला 

बेकायदा नळ कनेक्‍शन रोखल्याने केला हल्ला 

औरंगाबाद - बेकायदा नळ घेताना फोटो काढल्याने महापालिका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन) घडली. गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयएम नगरसेवकासह नागरिकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी (ता. तीन) रात्री महापौरांनी जखमी कर्मचाऱ्याची भेट घेतली. 

शुक्रवारी बारी कॉलनीमध्ये बेकायदा नळ घेतला जात होता. या ठिकाणी जाऊन पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी के. एस. मोरे यांनी फोटो काढले व त्यांना नळ घेण्यास मज्जाव केला. यावेळी नागरिक व एमआयएम नगरसेवकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्‍चर झाले. त्यानंतर मात्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले जखमी कर्मचाऱ्याची भेट घेतली. 

आयुक्तांनी घेतली दखल 
प्रकरणाची आयुक्तांनी दखल घेतली आहे. मारहाण प्रकरणात नगरसेवक कोण हे अद्याप समोर आलेले नाही. मोरे यांना पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित नगरसेवकावर कारवाई केली जाणार आहे. 

मोबाईल फोडून काठीने हल्ला 
माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचे जावई असलेले मोरे यांनी बेकायदा नळाचे फोटो काढल्याने नगरसेवकाने त्यांचा मोबाईल फोडला. त्यानंतर बेशुद्ध पडेपर्यंत त्यांना काठीने मारहाण करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com