पगार 23 जणांचा; हजर फक्त 10 जण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

औरंगाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला एक पोलिस निरीक्षक, एका उपनिरीक्षकासह 23 पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत; मात्र सध्या कामावर फक्त 10 कर्मचारी असल्याने पोलिस बंदोबस्ताअभावी अतिक्रमण हटावच्या कारवाया करण्यात अडथळे येत असल्याचे मंगळवारी (ता. चार) आढावा बैठकीत सांगण्यात आले. कामावर कर्मचारी कमी असले, तरी महापालिकेला मात्र 23 जणांचा पगार करावा लागत आहे. 

शहरात अतिक्रमण हटावच्या कारवाया करताना महापालिकेला वारंवार पोलिस बंदोबस्त मागावा लागत असे. त्यासाठीच्या पत्रव्यवहारात मोठा वेळ जात असल्यामुळे शासनाच्या धोरणानुसार स्वतंत्र बंदोबस्त मिळावा, अशी मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार स्वतंत्र फौजफाटा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय झाला. 23 जणांचे पथक महापालिकेला मिळाले. त्यांचे वेतन महापालिका करते. असे असताना सध्या केवळ 10 जणच महापालिकेत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी महापौरांनी आढावा घेतला असता, पूर्णपणे बंदोबस्त नसल्याने अतिक्रमण हटविण्यास अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इतर कामे करण्यास नकार 
अतिक्रमणासोबत इतर कामे करण्यास पोलिस नकार देतात. फक्त अतिक्रमण काढण्यासाठीच आम्ही आहोत, असे ते सांगतात. जेव्हा अतिक्रमणाच्या कारवाया नसतात तेव्हा हे पोलिस बसूनच राहतात. त्यामुळे महापालिकेला पोलिसांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

आढावा बैठकीत फक्त 10 कर्मचारी असल्याचे आढळून आले. त्यामुळे मी आयुक्तांची भेट घेऊन बदली कर्मचारी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 
- नंदकुमार घोडेले, महापौर.

Web Title: attend only 10 employees and salary of 23 employees