नोकरभरती गैरव्यवहारात किती जण लागणार गळाला - तुकाराम मुंढे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद - लाड समितीअंतर्गत झालेल्या नोकरभरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवारी (ता.२६) दुसऱ्यांदा महापालिकेत आले. दिवसभर त्यांनी आयुक्‍तांच्या दालनात बसून कागदपत्रे तपासली. चार वर्षांच्या काळात अनेक अस्थापना अधिकारी होऊन गेल्याने या गैरव्यवहारात किती मासे गळाला लागतील या धास्तीने अनेकांना घाम फुटला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे अहवाल दिला जाणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून २०१० ते २०१४  दरम्यान २३४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड समितीतून नियुक्‍त्या देण्यात आल्या होत्या. या नियुक्‍त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित झाला होता. यामुळे राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची चौकशी समिती गठित केली होती.

आठवडाभरापूर्वी बुधवारी (ता.१२) ते चौकशीसाठी महापालिकेत दाखल झाले होते. त्या वेळी त्यांनी लाड नियुक्ती प्रकरणातील दस्तावेज तपासले. जाताना त्यांनी महापालिकेतील अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, उपायुक्त अयुब खान यांना चौकशीबद्दल बाहेर कुणासमोरही वाच्यता न करण्याविषयी तंबी दिली होती. बाहेर माहिती गेल्यास तुमच्यावरच कारवाई केली जाईल, असा दम दिला होता. शासनाची विशेष चौकशी समिती असल्याने चौकशीची माहिती बाहेर जाऊ नये, याची पूर्ण काळजी मुंढेंकडून घेतली जात आहे.  बुधवारी (ता.२६) देखील चौकशीसाठी ते महापालिकेत आले होते; मात्र माध्यमांची आपल्यावर नजर पडू नये यासाठी मागच्या दारानेच प्रवेश करत थेट आयुक्त दालन गाठले. तीन ते साडेतीन तास त्यांनी आयुक्त दालनात दस्तावेज तपासले. मागच्याच दाराने ते बाहेर पडले. अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्याने श्री. मुंढे पुन्हा महापालिकेत येणार आहेत.

Web Title: auraangabad marathwada news How many people will get involved in the recruitment scam?