मराठवाड्यात हलका पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वदूर आज दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात घट झाली. अनेक भागांत तुरळक ते हलका पाऊस झाला. काही ठिकाणी हरभरा, गहू, ज्वारी काढणीला सुरवात झाली असून, बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांत धास्ती आहे. आंबा तसेच अन्य फळपिकांवरही परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दरम्यान, पुणे वेधशाळेने मराठवाड्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, प्रशासनाने सावधानतेच्या सूचना केल्या आहेत.
Web Title: auraangabad news marathwada rain