पावसाचा धोका, तिबार पेरणीचे संकट

मोहन सोळंके
रविवार, 30 जुलै 2017

आष्टी - पावसाने धोका दिल्याने परिसरातील अनेक भागात दुबार पेरणी करूनही पिकांची उगवण झाली नाही. त्यामुळे  येथील शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचे संकट आले आहे; तसेच यंदाही दुष्काळाची छाया अधिक गडद झाल्याने  परिसरातील शेतकरी धास्तावला आहेत.

मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळ पाठ सोडण्यास तयार नाही असे चित्र आहे. पावसाअभावी पहिली पेरणी वाया गेल्यानंतर आष्टी परिसरातील गंगासांवगी, गोळेगाव, कुंभारवाडी, लांडकदरा आदी गावांतील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली; मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणी करूनही पिकांची उगवण झाली नाही. त्यामुळे महागामोलाचे बी-बियाणे, खतांचा खर्चही आता शेतकऱ्यांच्या माथी पडला आहे. परिसरात मागील दोन आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: auranagbad news marathwada drought

टॅग्स