ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भोसले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मराठीतील प्रसिद्ध समीक्षक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. एस. भोसले (वय 82) यांचे बुधवारी दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

औरंगाबाद - मराठीतील प्रसिद्ध समीक्षक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. एस. भोसले (वय 82) यांचे बुधवारी दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

डॉ. भोसले हे कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी होते. प्रारंभी डॉ. भोसले यांनी कोल्हापूरच्या राजर्षी शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. त्यानंतर 1979 साली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. डॉ. भोसले यांनी वर्तमानपत्रात पुरवणीचे संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. याच दरम्यान त्यांनी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही काम पाहिले. त्यांनी काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य विश्‍वकोश मंडळावर सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या नावावर स्वलिखित 18 आणि 22 संपादित पुस्तके प्रकाशित आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा डॉ. भोसले यांना सहवास लाभला.

Web Title: aurangaabad marathwada news dr. s. s. bhosale death