फरारी स्कॉर्पिओचालकाचा शोध लागेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - चिखलठाणा येथे शनिवारी (ता. १६) पहाटे एका स्कॉर्पिओने सहा जणांना चिरडले. दरम्यान, स्कॉर्पिओ गाळात रुतल्याने वाहन जागीच सोडून चालकाने पळ काढला. त्याचा अद्याप शोध लागला नसून, वाहनमालकाचा शोध लागला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यात चारजण जागीच ठार झाले होते; तर दोघे जखमी आहेत.

चिकलठाणा येथे राहणारे भागीनाथ लिंबाजी गवळी (वय ४५), नारायण गंगाराम वाघमारे (७३), दगडुजी बालाजी ढवळे (६०), अनिल विठ्ठल सोनवणे (४५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. लहू बकाल व विजू करवंदे जखमी झालेत. ते सर्वजण शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास केंब्रिज स्कूलकडे मॉर्निंग वॉकसाठी जात होते. जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर अपघाताने चिकलठाण्यावर शोककळा पसरली; तसेच पादचाऱ्यांतही भीतीचे वातावरण आहे. अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओचालक वाहन घेऊन पळण्याच्या तयारीत होता; परंतु स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला एका चारीतील गाळात रुतली. त्यामुळे तो स्कॉर्पिओ सोडून तसाच पळून गेला. स्कॉर्पिओचे मागील एक चाक निखळलेले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहनाची पाहणी केली. वाहन क्रमांकावरून मालकाचा शोध त्यांनी घेतला. यात ऋषभकुमार जैन (रा. परतवाडा, जि. अमरावती) असे नाव समोर आले. 

पाण्यात मोबाईल भिजला
घटनास्थळी पाहणीनंतर स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना एक मोबाईल आढळला. पाण्यात पूर्णपणे भिजल्यामुळे तो उपयोगात येत नाही. मात्र, पोलिस मोबाईल दुरुस्ती करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

Web Title: aurangaabad marathwada news Finding absconding scorpio