भाचीवर डोळा; मामाने काढला काटा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

औरंगाबाद - रोहिला गल्लीत रविवारी (ता. दहा) सय्यद आखिल हुसेन सय्यद आमीद हुसेन (वय ४५, नूर कॉलनी) यांचा खून झाला. या प्रकरणी चौघांना अटक केली. खमरुन्निसा बेगम शेख हसन (३९), शेख सना शेख हसन (१९), शेख तय्यब शेख हसन (२१) आणि शेख शफीक शेख कादरी (३९, रा. पडेगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. 

मृत आखिलचे शफीकची बहीण खमरुन्निसाशी अनैतिक संबंध तर खमरुन्निसाची मुलगी सनावरही त्याची वाईट नजर असल्याच्या संशयातून शफीकने हत्या केली असू शकते, असे सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले.

किराडपुरा परिसरातील शेख इस्माईल शेख याकूब यांच्या तक्रारीनुसार, चष्म्याचा व्यापारी असलेला आखिल हा सात वर्षांपासून हकीम (वैद्य) झाला होता. दीड वर्षापासून त्याचे खमरुन्निसाशी अनैतिक संबंध होते.

खमरुन्निसाच्या पतीचा दुसरा विवाह झाला असून, तो दुसऱ्या पत्नीसोबत पडेगाव परिसरात राहतो. खमरुन्निसाचा मुलगा तय्यब आणि मुलगी सनाही आखिलला ओळखत होत्या. दरम्यान, सनाशी आपल्यासोबत लग्न लावून द्यावे, असा आग्रह आखिलने खमरुन्निसाकडे धरला. ही बाब खमरुन्निसाचा भाऊ शफीकला समजल्याने त्याने आखिलला संपविण्याचा निर्णय घेतला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

असा केला खून
तक्रारीनुसार, खमरुन्निसाने आखिलला रविवारी जेवणासाठी बोलाविले. त्या वेळी तय्यब कामावर गेलेला होता. आखिल हे दुपारी तिच्या घरी आले. दरम्यान, शफीकने चाकूने छातीत व पोटात वार करून त्यांना ठार केले. ही बाब सनाने भावाला फोन करून सांगितली. खमरुन्निसाने आखिलच्या मोबाइलवरून त्याचे नातेवाईक शेख इस्माईल शेख याकूब यांनाही याबाबत माहिती दिली. त्या तिघांनी आखिलला रिक्षातून ‘घाटी’त नेले. तेथून आई-मुलाने पळ काढत घरी येऊन घर धुऊन काढले. नंतर त्या पसार झाल्या. शैलजा जानकर यांच्या पथकाने त्यांना रात्री दोनच्या सुमारास अटक केली; तर फरार मामा शफीकला सोमवारी चार वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी पोलिसांसमोर हजर केले.

शफीकला केले मनोरुण 
शफीकला मूलबाळ होत नसल्यामुळे तो आखिलकडे उपचार घेत होता. दरम्यान, शफीकचे मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे त्याला पडेगाव येथील मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन तो परतला होता. आखिलमुळेच मी मानसिक रुग्ण झालो, त्याला सोडणार नाही, असे त्याने ठरविले. शिवाय आखिलची शफीकच्या भाचीवर वाईट नजरही होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे, असे पोलिस निरीक्षक कदम म्हणाले.

Web Title: aurangaabad marathwada news murder