समृद्धी महामार्गावरून काही नेत्यांना पोटशूळ - दानवे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

औरंगाबाद - रस्ते हे विकासाचे साधन असून, समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना पोटशूळ झाला, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली.

औरंगाबाद - रस्ते हे विकासाचे साधन असून, समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना पोटशूळ झाला, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली.

जालना लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण तालुक्‍यांतील विकासकामांबाबत त्यांनी आज (ता. 3) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलताना ते म्हणाले, पुणे-कोल्हापूर महामार्ग केला. त्या बदल्यात एकपट पैसे दिले. इथे आम्ही पाचपट देत आहोत. आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? विकासाच्या गोष्टी मराठवाडा, विदर्भात येऊ नये का, असा सवालही त्यांनी केला.

कर्जमाफीचे श्रेय शेतकरी आणि सरकारलाच जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: aurangaabad marathwada news samruddhi highway issue