बसमध्ये झाली ओळख, बसचालकाने केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद ( वाळूज) - बसमध्ये प्रवास करताना ओळख झाली, एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. यानंतर पतिपासून विभक्‍त झालेल्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवुन आणि मुलांचा सांभाळ करण्याचे अमिष दाखवुन 42 वर्षिय महिलेवर बलात्कार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा निवृत्त बसचालक आहे.

स्मार्टफोन, गेमिंगमुळे मुलांमध्ये वाढताहेत मानसिक आजार

पतिपासून विभक्‍त झालेली 42 वर्षिय महिला तिच्या एक मुलगा आणि एका मुलीसह वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहते. जुलै 2012 मध्ये ती नाशिकला जाण्यासाठी बसमध्ये चढली. बसमध्ये गर्दी खूप असल्याने तिला बसचालकाच्या शेजारी बसावे लागले. गप्पांच्या ओघात बसचालक देविदास रामचंद्र चव्हाण यांच्याशी ओळख झाली. दोघांनीही एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. यानंतर बसचालकाने तिच्याशी संपर्क साधला.

लातूरचे महापौरपद बीसीसीसाठी आरक्षीत

ओळख वाढत गेल्याने तो तिला भेटायला साऊथ सिटी येथे आला. या भेटीत त्याने मी तुझ्या मुलांचा सांभाळ करीन, लग्न करीन असे गोडगोड बोलून जवळीकता वाढवली आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. दर आठवड्याला तीन चार दिवस त्याचा मुक्‍काम तिच्याकडे होउ लागला. एक दिवस तो तिच्या घरी असताना त्याला एका महिलेचा फोन आला. त्यामुळे दोघामध्ये वाद झाल्याने त्याने शिवीगाळ करून तू माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तुला व तुझ्या मुलांना जिवे मारीन अशी धमकी दिली.

औरंगाबादमधील शक्कर बावडीने गाठला नाही कधीच तळ, पाहा VIDEO

महिलेच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालूक्‍यातील सुरेगाव येथील बसचालक देविदास रामचंद्र चव्हाण ( वय 60 ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad raped by bus driver