भरतीच्या खोट्या जाहिरातींनी विमानतळ प्रशासन त्रस्त 

अनिल जमधडे
शनिवार, 7 एप्रिल 2018

औरंगाबाद - विमानतळावर भरती सुरू असल्याच्या वारंवार येणाऱ्या जाहिराती, त्यातून फसवणूक झालेल्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विमानतळ प्रशासन त्रस्त झाले आहे. विमानतळाच्या भरतीची प्रक्रिया विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाते. त्यामुळे बनावट जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाने केले आहे. 

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळासह विविध विमानतळांवर भरती सुरू असल्याच्या जाहिराती विविध वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत. भरतीच्या नावाखाली संपर्क साधल्यानंतर उमेदवारांना विशिष्ट रक्कम भरण्यास सांगून फसवणूक केली जाते. ही रक्कम मोठी नसल्याने उमेदवार पोलिस कारवाईच्या भानगडीत पडत नाहीत; मात्र अशा भरतीबाबत विचारणा करण्यासाठी बेरोजगार विमानतळावर चौकशी करीत आहेत. काहीजण तर नोकरी मिळण्यासाठी अर्ज कुठे द्यावा, अशी विचारणा करण्यासाठी विमानतळावर येत आहेत. रोज ही संख्या वाढत आहे, यातून तरुणांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. देशभरातील विविध विमानतळांवरही हाच अनुभव येत आहे 

भरती प्रक्रिया खरी की खोटी 
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या भरतीच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया प्राधिकरणाच्या www.aai.aero या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे एम्प्लॉयमेंट न्यूज व संकेतस्थळावरच याची माहिती दिली जाते. विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी वर्तमानपत्रांत जाहिरात देत नाही. विमानतळ प्राधिकरणाने भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही खासगी संस्थेला नेमलेले नाही. त्यामुळे तरुणांनी अशा बनावट जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन विमानतळ निदेशक डी. जी. साळवे यांनी केले आहे. 

Web Title: aurangabad Airport administrations suffer from fake advertisements