Aurangabad: प्राण्यांच्या ५५७ नवीन प्रजातींचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राण्यांच्या ५५७ नवीन प्रजातींचा शोध

औरंगाबाद : प्राण्यांच्या ५५७ नवीन प्रजातींचा शोध

औरंगाबाद : देशभरात मागील वर्षात (२०२०) प्राण्यांच्या ५५७ प्रजाती आढळून आल्या आहेत. यातील ४०७ प्रजाती नवीन असून १५० प्रजातींची या देशात पहिल्यांदाच नोंद घेण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रातील २४ प्रजातींचा समावेश आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने (झेडएसआय) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

भारतीय भूभाग २३.३९ टक्के वने आणि वृक्षाच्छादनाने व्याप्त आहे. या भूभागावर विविध जीवांचा अधिवास आहे. अनेकांपासून आजही आपण अनभिज्ञ आहोत. ‘झेडएसआय’ संस्थेकडून ‘ॲनिमल डिस्कव्हरीज न्यू स्पेसीज रेकॉर्ड’ हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाच्या अहवालात वर्ष २०२० मध्ये देशातून नोंदविण्यात आलेल्या ५५७ प्रजातींच्या प्राण्यांची (जिवांची) नोंद घेण्यात आली आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

यात कीटक, उभयचर, जलचर, पक्षी, पाली, खेकडे, समुद्रजीव, सरपटणारे आदी जिवांचा समावेश आहे. देशातून पहिल्यांदाच (न्यू रेकॉर्ड) नोंद घेण्यात आलेल्या प्रजाती या सर्वाधिक कर्नाटक आणि केरळ राज्यात आढळल्या आहेत. महाराष्ट्रात २४ प्रजाती आढळून आलेल्या असून त्या नंदुरबार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पालघर, पुणे, सोलापूर, बुलडाणा या जिल्ह्यांतून नोंदविण्यात आलेल्या आहेत. पैकी दोन प्रजातींची देशातून पहिल्यांदाच (न्यू रेकॉर्ड) नोंद घेण्यात आली आहे हे विशेष. राज्यातून नोंदविण्यात आलेल्या जीवांमध्ये सर्वाधिक जीव हे कीटकवर्गीय आहेत.

प्रजातींच्या नोंदीत आघाडीवर

केरळ

६१

राजस्थान

५९

कर्नाटक

६९

प. बंगाल

४४

अंदमान

४१

प्राणी आढळण्याचे प्रमाण

२०१६ ३९४

२०१७ ४७४

२०१८ ५११

२०१९ ४८०

२०२० ५५७

loading image
go to top