औरंगाबाद खंडपीठाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खडसावले 

सुषेन जाधव 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : परिक्षेच्या 15 दिवस आधी परिक्षेचे वेळापत्रक बदल्याच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी वेळापत्रक बदलण्यासारखी कृती विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी व अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास नोटीस बजावण्याचे आदेश दिले. 

 नंदूरबार येथील कवीयत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणारे विनय कोठारी यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्‍ट 2016 च्या कलम 88 मध्ये आदेशित केले आहे की, ''पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठांनी परीक्षेच्या वेळापत्रकात मागील शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी वेळापत्रक प्रकाशित करणे आवश्‍यक आहे.'' अॅड. तळेकर यांनी युक्तीवाद करताना स्पष्ट केले की, अग्रिम सूचना दिल्याशिवाय निश्‍चित कालावधीत परीक्षेचे वेळापत्रक पंधरा दिवस अगोदर प्रकाशित करणे हे महाराष्ट्र लोक विद्यापीठ कायदा 2016 चे कलम 88 चे उल्लंघन आहे. राज्यातील अनेक विद्यापीठ या कायद्याचे उल्लंघन करतात. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच अन्याय होत आहे. विद्यापीठ आणि शासनाने आवश्‍यक त्या सूचना घेऊन डिसेंबरला खंडपीठात सादर कराव्यात असे आदेश दिले. प्रकरणात अॅड. तळेकर यांना अॅड. दिव्या त्यागी यांनी सहाय्य केले. 

Web Title: The Aurangabad Bench dismissed the North Maharashtra University