पकडलेले कुत्रे आता पळून जाणार नाहीत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - महापालिकेच्या मध्यवर्ती जकात नाका परिसरातील श्‍वानगृहाच्या दुरवस्थेमुळे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पकडून आणलेले कुत्रे पसार होत होते. महापालिकेने शस्त्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीने याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही फाइल जागची हलत नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी श्‍वानगृहाची दुरुस्ती करण्यात आली.  

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दीड वर्षापासून नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. दरम्यान, शहरातील कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे कंत्राट महापालिकेने पुण्याच्या ब्ल्यू क्रॉस एजन्सीला दिले. या एजन्सीने नेमलेले कर्मचारी दिवसभर शहरात फिरून मोकाट कुत्रे पकडतात. पकडलेल्या कुत्र्यांना मध्यवर्ती जकात नाका परिसरातील श्‍वानगृहात ठेवले जाते. नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्यांना तीन दिवस देखरेखीखाली ठेवले जाते. मात्र येथील श्‍वानगृहाची दुरवस्था झाल्याने पकडून आणलेले कुत्रे तुटलेल्या जाळीतून पळून जात होते. त्यामुळे एजन्सीचे कर्मचारी त्रस्त होते. श्‍वानगृहाची दुरुस्ती करा; अन्यथा काम बंद करू असे पत्रही एजन्सीने महापालिकेला दिले होते. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही फाइल जागची हलत नव्हती. याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच मोडकळीस आलेल्या श्‍वानगृहाची दुरुस्ती केली आहे.

Web Title: Aurangabad city became a serious question stray dogs