औरंगाबाद शहरात फक्त रिमझिम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

जिल्ह्यात पाऊस कमीच 
रविवारी सकाळी साडेआठपर्यंत सरासरी फक्त ४.३२ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात ९.५०, फुलंब्री ६.२५, पैठण २.२०, सिल्लोड ८.१३, सोयगाव ६.३३, वैजापूर १.५, गंगापूर ०.३३, कन्नड ४, तर खुलताबाद तालुक्‍यात ०.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सर्वाधिक पाऊस औरंगाबाद तालुक्‍यात, तर सर्वांत कमी पाऊस गंगापूर तालुक्‍यात झाला.

औरंगाबाद - सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात १७.९, तर त्यानंतर फक्त ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली होती. ती सकाळपर्यंत कायम राहिल्याने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला. 

यंदा मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्याने शहरासह जिल्ह्यातही पाऊस लांबला. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहरात सर्वत्र पावसाची रिमझिम होती. अनेकजण रेनकोट घालून, तर काहीजण छत्र्या घेऊन मॉर्निंग वॉकला गेले. पहाटेच्या वेळेस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळी शहरात ३.४ मिलिमीटर पाऊस पडला. सकाळी दहानंतर शहरात पाऊस पडला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City Rain