पारा गाठू शकतो बेचाळीसचा आकडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - उन्हाचा कडाका वाढीस लागला असून, या आठवड्याच्या शेवटी पारा ४२ अंशांपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, किमान तापमान २३ ते २६ अंशांदरम्यान राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शहरातील पारा आता चाळिशीला टेकला आहे. रविवारी (ता. १५) शहराचे तापमान ३९.३७ अंशांवर गेल्याने उन्हाचा दाह सहन करावा लागला. किमान तापमानही २४.८ अंशांवर टेकल्याने रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली. येणाऱ्या आठवड्यात उन्हाचा पारा चढाच राहणार असून, तापमापकाचा आकडा ४२ अंशांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.

Web Title: aurangabad city temperature