औरंगाबादेत पुन्हा कोरोना वाढतोय, १३८ पॉझिटिव्हची भर, बळींची संख्या १,१२४ वर

corona image.jpg
corona image.jpg

औरंगाबाद : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली होती. परिस्थिती सुधारत असताना दिवाळीपासून मात्र रुग्णसंख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दोन दिवासांपासून शंभराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. बुधवारी (ता.१८) जिल्ह्यात १३८ नवीन रुग्णांची भर पडली आहेत. तर ८७ जणांनी आज सुट्टी देण्यात आली आहेत. तर आजपर्यंत ४० हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ९१४ झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार १२४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जिल्ह्यात सध्या ६२९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. अशी माहिती. जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आली. 

महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या : 
जालान नगर (३), एन ७ सिडको (२), पेशवे नगर, सातारा परिसर (१), रचनाकार कॉलनी (८), गोविंद नगर आरटीओ रोड (१), गारखेडा व्यकटेश मंगल कार्यालय (१), आलोक नहर बीड बाय पास परिसर (१), गृह निर्माण योजना, शिवाजी नगर (१), गणेश नगर दिवाण देवडी (१), सराफा रोड(३), एन ३ सिडको (१), वेदांत नगर (१), शास्त्री नगर(१), मल्हार चौक परिसर (१), बालाजी नगर (१), बजाज नगर (१), बेगमपुरा(१), स्वप्न नगरी (१), नंदनवन कॉलनी(४), व्यंकटेश नगर (२), गारखेडा परिसर (१), बीड बायपास (४), म्हाडा कॉलनी (१), शुभश्री कॉलनी (१), पेठे नगर, भावसिंगपुरा (१), पडेगाव (४), मुलांचे वसतीगृह, घाटी (२), मार्ड हॉस्टेल (१), निराला बाजार (१), कांचनवाडी (१), बन्सीलाल नगर (१), नागेश्वरवाडी (१), बजाज नगर (१), दीप नगर, शहानूरवाडी (१), अन्य (५९) असे एकून ११६ रुग्ण आढळून आले. 

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या : 
समता नगर, गंगापूर (१), अजंता फार्मा, पैठण एमआयडीसी (१), सिडको महानगर, तीसगाव (५), मोहटादेवी चौक् बजाजनगर, वडगाव (१), सावरकर कॉलनी, बजाजनगर, वडगाव सिडको (१), मुंडे चौक, जवळ,बजाजनगर ,वडगाव (१), न्यू भारत नगर, रांजणगाव (१), शिवाजी नगर, वडगाव (२), फुलेवाडी, वैजापूर (१), बाजाठाण फाटा , वैजापूर (१), न्यू हायस्कूल, गणोरी (४), कासोद, सिल्लोड (१), अन्य (२) असे एकुण २२ रुग्ण अढळून आले आहेत. 

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील ६२ वर्षीय स्त्री, सिद्धार्थ नगर येथील ३२ वर्षीय पुरूष,सिद्धेश्वर नगर, जाधववाडीतील ४८ वर्षीय पुरूष आणि खासगी रूग्णालयात मयूरबन कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा जवळील ५३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com