धम्मगुरु दलाई लामा यांचे औरंगाबादेत आगमन 

dalai lama
dalai lama

औरंगाबाद  : जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे सकाळी दहा वाजता चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. 


दलाई लामा यांच्या स्वागतासाठी मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद येथील चित्रकारांनी आकर्षक प्रदर्शन साकारले होते. यावेळी डॉ. हर्षदीप कांबळे, विमानतळ संचालक डी. जी. साळवे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. विमानतळावर लावलेल्या प्रदर्शनाची माहिती घेत त्यांनी उपासकांना आर्शिवाद दिले. दलाई लामा यांच्या स्वागतासाठी विमानतळ प्राधिकरणाने गेल्या तीन दिवसांपासून जंगी तयारी केली होती. विमानतळात चित्रप्रदर्शनासह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दलाई लामा यांच्या आगमनाच्या अनुशंगाने कडक सुरक्षा व्यावस्था ठेवण्यात आली होती. 

शुक्रवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता जागकि बौद्ध धम्म परिषदेला सुरवात होत आहे. या तीनदिवसीय परिषदेसाठी शांततेचा शिस्त व नियोजनबद्ध तयारी करण्यात आली. या परिषदेला देशविदेशासह कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका नागसेनवनात दाखल झाले आहेत. नागसेनवनातील पीईएसच्या मैदानावर तीन दिवस बौद्ध धम्मावर चर्चा, परिसंवाद होऊन काही ठराव मांडले जाणार आहेत. परिषदेचे मुख्य आकर्षण दलाई लामा आहेत. त्यांच्यासह तेरा देशातील बौद्ध भिक्‍खू उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय भिक्‍खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन (साऊथ कोरिया), भदन्त प्रधामबोधिवॉंग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. हर्षदीप कांबळे व थायलंडच्या उद्योजिका रोचना व्हॅनिच कांबळे परिषदेच्या मुख्य संयोजक आहेत. 

एक सत्र भिक्‍खूंसाठी 

शनिवारी सकाळी नऊ ते बारादरम्यान चौका येथील लोकुत्तरा महाविहारात केवळ बौद्ध भिक्‍खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5.30 ते रात्री 9.30 या वेळेत बुद्धांनी दिलेली शिकवण याचे विश्‍लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्‍खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत. 

क्‍लिक करा : औरंगाबादमध्ये कुपोषणाची छावणी​

रविवारी दलाई लामा यांची धम्मदेसना 

रविवारी पहाटेच्या विपश्‍यनेनंतर सकाळी 9.30 वाजता दलाई लामा यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी एकपासून तीन वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत उपासक-उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. रात्री 8.30 वाजता सुरू होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर परिषदेची सांगता होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com