'त्या' व्हायरल फोटोवरून डॉ. तात्याराव लहाने यांनी केली घाटीची कानउघाडणी

योगेश पायघन
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी त्या व्हायरल फोटोतील चिमुकलीच्या हाती सलाईन का दिली? असा सवाल करत दोन मिनिट नव्हे साडे सात मिनिट ती मुलगी ताटकळत उभी होती. तुमच्या चूकांमुळे राज्यभर उत्तरे द्यावी लागत असल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत घाटी प्रशासनाची कानउघडणी केली.

औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी त्या व्हायरल फोटोतील चिमुकलीच्या हाती सलाईन का दिली? असा सवाल करत दोन मिनिट नव्हे साडे सात मिनिट ती मुलगी ताटकळत उभी होती. तुमच्या चूकांमुळे राज्यभर उत्तरे द्यावी लागत असल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत घाटी प्रशासनाची कानउघडणी केली.

घाटीत 5 मे ला खुलताबाद तालुक्यातील एकनाथ गवळे यांच्यावर सर्जरी नंतर वार्ड 19 मध्ये शिफ्ट करतांना मुलीला सलाईन धरायला लावलेला फोटो व्हायरल झाला होता. त्याची केंद्रासह राज्य शासनाने दखल घेत घाटीकडे विचारणा केली होती. तसेच सोशल मीडिया वर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकानी सरकारला हेच का ते अच्छे दिन असा सवाल केला होता. 

दरम्यान, शुक्रवारी (ता.24) पाहणीसाठी आलेले डीएमइआर सहसंचालक डॉ तात्याराव लहाने यांनी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास वार्ड 19 मध्ये प्रवेश केला. तिथे जाताच त्या प्रकरणाची विचारणा केली. तेव्हा दोन मिनीटच मुलीला स्टँड आणेपर्यंत सलाईन धरायला लावण्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, डॉ लहाने यांनी तो युक्तिवाद खोडून काढत साडे सात मिनिटे लागल्याचे सांगितले. तेव्हा अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनीही पाच ते सात मिनिट लागल्याचा होकार भरला. 

त्या चिमुकलीनला सलाईन का पकडायला लावले ? का तुम्ही चुकी केली ? तुमच्या लहानशा चुकीमुळे महाराष्ट्रभर फिरतांना उत्तरे द्यावी लागत असल्याचे सांगून पुढे असे प्रकार घडू देऊ नका. असा दम डॉ. तात्याराव लहाने यांनी भरला. यावेळीअधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, सर्जरी विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, उप अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. राहूल पांढरे, डॉ विकास राठोड यांची उपस्थित होती. चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकारामुळे घाटी प्रशासन आज चांगलेच तोंडाघशी पडले आहे. 

छोट्या चुकीमुळे राज्यभर बदनामी
व्हायरल झालेल्या चिमुकली धृपदाचा फोटो हा घाटीच्या बदनामीच्या हेतूने काढला आहे. दोनच मिनिट स्टँड कर्मचाऱ्याने आणेपर्यंतच मुलीला सलाईन धरायला दिली होती असे अधिष्ठातांनी स्पष्ट केले होते. असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊ असेही सांगितले होते. आज डॉ. तात्याराव लहाने यांनी हा दोन मिनिटांचा युक्तिवाद खोडून काढत साडेसात मिनीट चिमुकलीला का सलाईन हातात का दिले? असा सवाल करत घाटी प्रशासनाला पुन्हा अशा चूक घडणार नाही याची दक्षता घेण्याचा सज्जड दमही त्यांनी भरला.

Web Title: aurangabad daughter hold saline for father becuase saline stand not available in ghati hospital