Aurangabad-Dhule National Highway accident
Aurangabad-Dhule National Highway accidentsakal

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात

चोराखळीजवळ गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन वाहनांमध्ये अपघात होऊन ८ जण जखमी झाले आहे.

कळंब : औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर चोराखळीजवळ गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन वाहनांमध्ये अपघात होऊन ८ जण जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावर अचानक गाय आडवी आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात उस्मानाबाद उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन भूमला जात होते, तर येरमळाहून उस्मानाबादकडे येत असलेल्या मारुती गाडीला धडक बसली.

प्रत्यक्षदर्शींनींकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तालुकास्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात येते. त्यानुसार परिवहन विभागाचे इन्स्पेक्टर श्री शिंदे, मोटारवाहन निरीक्षक होले, चालक बाळासाहेब काळे हे शिबिरासाठी भूमकडे (एमएच ०६ एडब्ल्यू ४३०१) जात होते. महामार्गावर चोराखळीजवळ अचानक गाय आडवी आली. तिला वाचविण्याचा प्रयत्नात येरमळ्याहून उस्मानाबादकडे येत असलेली मारुती वाहनाला (एमएच १२ पीएच २५०३) आरटीओच्या वाहनाची जोरात धडक बसली.

अपघातात तालुक्यातील चोराखळी नजीक राष्ट्रीय महामार्गवर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात नेहले आहे. प्रादेशिक परिवहन विभागचे कर्मचारी चोराखळी कडे जात असताना गाय आडवी आली आणि त्या वाहनाचा ताबा सुटून दुसऱ्या बाजूस असलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीला जाऊन धडकली.

अपघातात महिलेचा एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजते. इतरांना शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी आणले त्यातील काहीना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर प्रादेशिक परिवहन विभागाचे चालक बाळासाहेब काळे यांची परस्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com