औरंगाबाद जिल्हा पाणंदमुक्त झालाच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

अधिकारी, कर्मचारी यांना सूचना; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

औरंगाबाद- स्वच्छ भारत मिशन व मग्रारोहयोचे काम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शनिवार (ता.18) जिल्हा परिषदेच्या सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, गट समन्वयक, सहायक कार्यक्रमाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्हा पाणंदमुक्त झाला पाहिजे, हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्याच्या कडक शब्दात सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मुधकर अर्दड यांनी दिल्या.

गंगापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत किन्हळ-देव्हळ व ग्रामपंचायत गवळी धानोरा शंभर टक्के पाणंदमुक्त केल्याबद्दल ग्रामसेविका अर्चना सावंत, शेख सुमय्या यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्हा ऑक्‍टोबर 2017 पाणंदमुक्त करायचा आहे. यासाठी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी शौचालयाच्या कामात पुढाकार घेऊन ग्रामपंचायत पाणंदमुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) परमेश्‍वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) वासुदेव सोळुंके, मग्रारोहयोचे सहायक गटविकास अधिकारी एस. आर. कुलकर्णी, गंगापूरचे गटविकास अधिकारी जोंधळे यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad district and water