औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल 88.81 टक्‍के 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

औरंगाबाद - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत(दहावी)  औरंगाबाद विभागाचा निकाला 88.81 टक्‍के लागला आहेत.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 0.66 टक्‍के निकाल वाढला आहेत. विभागातून एक लाख 88 हजार 319 विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 1 लाख  67  हजार  244  विद्यार्थी  उर्त्तीण झाले आहे. यात मुलींनी 92.23 टक्‍के मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.  अशी माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या प्रभारी विभागीय अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी शुक्रवारी (ता.8) दिली. 

मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विभागातून 1 लाख 89 हजार 615  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावेळी एक लाख 88 हजार 319 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 1 हजार 296 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते. यात 7 हजार 907 विद्यार्थी पुर्नपरीक्षा दिली. यात 3 हजार 348 विद्यार्थी उर्त्तीण झाली आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील 2 हजार 461 माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 606 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आली. यासाठी 60 परिक्षक, 606 केंद्र संचालक, 606  सहकेंद्रसंचालक, 8 हजार 484 पर्यवेक्षक, 21 मुख्यनियमाक, 1हजार 361 नियामक व 7 हजार 962 परीक्षक कार्यरत होते. निकाला बीड जिल्हा आघाडीवर बीड जिल्ह्याचा निकाल 92.54 टक्‍के लागला आहे. तर सर्वात कमी हिंगोली जिल्ह्याचा 77.37 टक्‍के लागला आहे. यावेळी शिक्षक उपसंचालक वैजिनाथ खांडके उपस्थित होते

Web Title: Aurangabad division results in Class X results of 88.81 percent