औरंगाबाद पूर्वमध्ये अकरापर्यंत 19 टक्के मतदान

सेंट्रल नाका येथील मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा
सेंट्रल नाका येथील मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा

औरंगाबाद - औरंगाबाद पुर्वमध्ये सकाळी रिमझिम पावसामुळे कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी आकरा वाजल्यानंतर शहरातील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी थोड्या बहुत रांगा लागल्याच चित्र पहावयास मिळत असून अकरावाजेपर्यत 19 टक्के मतदान झाले आहे.

सकाळी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतू पावसामुळे मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर तुरळक माणसे मतदानासाठी आलेले होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यत केवळ 6. 71 टक्के इतके मतदान झाले होते. परंतू त्यानंतर मतदानासाठी लोक बाहेर पडतांना दिसत होते. काही मतदान केंद्रावर छोट्या - छोट्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. मतदानासाठी लोक घराबाहेर पडले.


" आत्तापर्यंत औरंगाबादपूर्व मध्ये 35 हजार 129 पुरुष, 25 हजार 625 महिला असे एकूण 60 हजार 754 मतदान पार पडले आहे. त्यामध्ये
पुरुषांची टक्केवारी 20 तर महिलांचे सोळा टक्के मतदान झाले आहे.  मतदान प्रक्रियेला अकरा वाजेनंतर वेग आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com