औरंगाबाद पूर्वमध्ये तिरंगी लढत ; 34 उमेदवार रिंगणात

प्रकाश बनकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी 65 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यातील सहा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले; तर उर्वरित अर्जांपैकी सोमवारी (ता. सात) 13 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात प्रमुख्याने शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी माघार घेतल्यामुळे पूर्वमध्ये आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. 

या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. अब्दुल गफ्फार कादरी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत समाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक अर्ज पूर्व मतदारसंघात आले होते. मतदारसंघातून 23 अपक्ष, तर विविध पक्षांच्या 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. 2014 मध्ये एमआयएम आणि भाजपमध्ये थेट लढत झाली होती.

भाजप पहिल्या; तर एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या स्थानी होता. पूर्व कॉंग्रेसचा बालेकिल्ला असतानाही वर्ष 2014 मध्ये कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकली गेली होती; मात्र यावेळी युती झाल्यामुळे भाजप व शिवसेनेच्या मतदारांचे विभाजन होणार नाही. दरम्यान, पूर्वमधून तब्बल 13 मुस्लिम उमेदवार असल्यामुळे एमआयएमचे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणार असल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत. यासह 11 उमेदवार हे बहुजन समाजाचे आहेत. त्यांचाही फटका एमआयएमला बसू शकतो. तसे झाल्यास याचा फायदा महायुतीचे उमेदवार सावेंना होणार आहे. 

यांनी घेतली माघार 
विशाल उद्धव नांदरकर,रमेश तातेराव गायकवाड, जगन्नाथ किसन उगले, अय्युब जब्बारखान पठाण ,नितीन पुंडलिक घुगे, इब्राहिम इमाम शेख ,फेरोज खान मुसा खान, अहमद हुसैन अल हमीद , कचरू श्रीपत सोनवणे , मतीन माजीद पटेल , रेणुकादास दत्तोपंत वैद्य, शेख समद शेख मदन , साजीद पटेल बेगू पटेल यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad fighting triangular in the east