औरंगाबादेत ध्वजारोहनप्रसंगी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

राजेभाऊ मोगल
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन सुरु असतानाच एकाने आयुक्त परिसरात तर दुसऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. १५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी वेळीच सावधानता दाखविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सध्या सर्वत्र सरकार विरोधी वातावरण निर्माण झाल्याने विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. बुधवारी ध्वजवंदनसाठी विभागीय आयुक्तालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालकमंत्री सावंत यांचे आगमन होताच बदनापुर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाड़े, पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले. त्याच वेळी त्यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड़ तालुक्यातील भगवान वारे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत पोलिसांनी खबरदारी घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी नेमक्या कुठल्या कारणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला, याची माहिती प्रशासन घेत आहे.

Web Title: Aurangabad flag Hosting event two men suicide attempt