औरंगाबादमध्ये होणार रोज चारशे लहान मोठ्या जनावरांची कत्तल 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अपेडा (ऍग्रीकल्चर ऍण्ड प्रोसेसड्‌ फूड प्रॉडक्‍ट एक्‍सपोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी) च्या मान्यतेनंतर हा प्रकल्प सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मंगळवार (ता.दहा) पर्यंत अपेडाकडून तपासणी केली जाण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद - पडेगाव येथे महापालिकेच्या अत्याधुनिक कत्तलखान्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरु असून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावर हा प्रकल्प होत आहे. गेल्या आठ महिन्यात मोठ्या जनावरांची कत्तल करणाऱ्या सेमी ऑटोमेटीक प्लांटचे काम पूर्ण झाले असून रोज शंभर मोठ्या जनावरांची कत्तल करण्याची याची क्षमता आहे.

आता छोट्या जनावरांच्या कत्तलीसाठी ऑटोमेटीक प्लांटचे काम सुरु असून या ठिकाणी दररोज छोट्या मोठ्या मिळून 400 जनावरांची कत्तल करण्याची सुविधा तयार होणार आहे. अपेडा (ऍग्रीकल्चर ऍण्ड प्रोसेसड्‌ फूड प्रॉडक्‍ट एक्‍सपोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी) च्या मान्यतेनंतर हा प्रकल्प सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मंगळवार (ता.दहा) पर्यंत अपेडाकडून तपासणी केली जाण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा  ; सीसीटीव्ही बंद ठेऊन फिटनेस तपासणी , आरटीओची प्रक्रियाच संशयास्पद 

पडेगाव येथील महापालिकेच्या 36 एकरपैकी 18 एकर जागेत 1985-86 मध्ये महापालिकेने कत्तलखाना सुरू केला तर उर्वरित जागेत 185 मांस विक्रेत्यांना भूखंड देण्याचा निर्णय झाला होता. मात्र येथे पीपीपी तत्वावर अत्याधुनिक कत्तलखाना प्रकल्प उभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मांस विक्रेत्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र निकाल त्यांच्या विरोधात गेला. यानंतरही महापालिका प्रशासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले. त्यामुळे 2014 पासून 2019 पर्यंत अत्याधुनिक कत्तलखान्याचे काम रखडलेले होते. 

सहा महिन्यापूर्वी यावर तोडगा काढत आयुक्त डॉ. निपुण विनायक हे सुटीवर गेलेले असताना प्रभारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने प्रशासनाने 23 गोदामे निष्कासित केली. त्यामुळे पुढे कत्तलखान्याच्या कामाला कंत्राटदार मेसर्स अल कुरेश एक्‍सपोर्टस्‌ लिमिटेड कंपनीने गती दिली. गेल्या आठ महिन्यात मोठ्या जनावरांची कत्तल करणाऱ्या सेमी ऑटो प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. रोजची मोठी शंभर जनावरांची कत्तल करण्याची याची क्षमता आहे. तसेच छोट्या जनावरांच्या कत्तलीसाठीच्या ऑटोमेटिक प्लांटचे काम सध्या सुरू आहे. रोजची 400 छोटी जनावरांची कत्तल करण्याची याची क्षमता आहे. 

क्लिक करा ; शेतकरी महिलेने फुलविला कलकत्ता पानमळा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad Four hundred animals are slaughtered every day