शुक्रवारपासून रंगणार चौथा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - नाथ ग्रुप व पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे प्रोझोन मॉलमध्ये चौथा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून (ता. तीन) होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, डॉ. उल्हास गवळी, "प्रोझोन'चे निखिल चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होईल, अशी माहिती "नाथ ग्रुप'चे सतीश कागलीवाल यांनी बुधवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली.

तीनदिवसीय महोत्सवास शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता "प्रोझोन'च्या सत्यम सिनेमागृहात प्रारंभ होईल. याविषयी श्री. कागलीवाल म्हणाले, की या महोत्सवामुळे अल्पवधीत औरंगाबादकरांना आंतरराष्ट्रीय दर्जेदार सिनेमे बघायला मिळाले. याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहेत. यंदाही हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहेत. यंदाच्या महोत्सवात 3 ते 6 फेब्रुवारीदरम्यान 30 वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुकिंग सुरू आहे. याला प्रतिसादही मोठा मिळत आहे. महोत्सापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी रससंवाद कार्यक्रम घेऊन याविषयी जनजागृती करण्यात येत अहोत. महोत्सवासाठी या वर्षी दरवर्षीप्रमाणे प्रोझोनमध्ये तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रोझोनचे मोहंमद अर्शद यांनी सांगितले. या वेळी नाथ ग्रुपचे संतोष जोशी, श्रीकांत उमरीकर उपस्थित होते.

लघुपट महोत्सवात देशभरातून 43 लघुपटांची एंट्री
चौथ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त तरुणाईसाठी लघुपट महोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये देशभरातून 43 एंट्री आली आहेत. लेखक अजित दळवी हे या लघुपटातून तीन ते चार लघुपटांची निवड करणार आहेत. यातून निवड झालेले लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात चार फेब्रुवारीला दुपारी 12.45 वाजता दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवातील सिनेमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महोत्सावचे संचालक डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, समन्वयक उल्हास गवळी, निखिल चतुर्वेदी यांनी केले आहे.

Web Title: Aurangabad fourth International Film Festival