औरंगाबाद - जीएसटी, मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला 24 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

औरंगाबाद : जीएसटी, एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनाने महापालिकेला जून महिन्यात 24 कोटी 91 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यात जीएसटीचे 21.12 कोटी तर मुद्रांक शुल्काच्या दोन दोन महिन्याच्या 3 कोटी 79 लाख रुपयांचा समावेश आहे. 

स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी बंद झाल्यापासून शासनातर्फे महापालिकेला जीएसटीपोटी (वस्तू सेवा कर) अनुदान देण्यात येते. गतवर्षी सरासरी 20 कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळत होते. यंदाच्या आर्थिक वर्षांपासून त्यात वाढ करण्यात आली आहे. जून महिन्यात महापालिकेला 21 कोटी 12 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच एप्रिल व मे महिन्याच्या एक टक्का मुद्रांकशुल्कापोटी 3 कोटी 79 लाख रुपयांचे अनुदान शासनाने वितरित केले आहे.

Web Title: aurangabad got 24 crores for gst and stamp duty