औरंगाबाद-हसनाबाद मुक्कामी बस दहा दिवसांपासून बंद

बस
बस

तळेगाव  (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता. फुलंब्री) तळेगाव परिसरातील हसनाबाद-औरंगाबाद मुक्कामी पंधरा वर्षांपासून सुरू असलेली परिवहन मंडळाची बससेवा अचानक दोन आठवड्यांपासून बंद केल्याने रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिसरातील वजिरखेडा, जवखेडा, सिरसखाव, तळेगाव, हसनाबाद, पिंपळगाव, टाकळी, खादगाव, सावखेडा, एकेफळ पिंपरी या गावांतील विद्यार्थी व प्रवाशांची तालुक्‍याच्या ठिकाणी शिक्षणासाठी, ग्रामस्थांची औरंगाबादला दवाखाने, विभागीय कार्यालये, बाजारपेठेत व इतर कामांसाठी सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कामासाठी नेहमी या बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.


औरंगाबाद-फुलंब्री-तळेगाव मार्गे हसनाबाद मुक्कामी असणारी बस दहा दिवसांपासून अचानक बंद झाली आहे. औरंगाबादहून तळेगावकडे परतीचा प्रवास करणाऱ्या परिसरातील प्रवाशांना एसटी बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक विभागाने कोणत्याही सूचनेशिवाय बस बंद केल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील प्रवाशांमधून हसनाबाद मुक्कामी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.


गौरी गणपती उत्सवासाठी आगारातून वीस बसगाड्या पाठविल्याने मुक्कामी बस बंद होती. दोन दिवसांत हसनाबाद बस सुरू करण्यात येईल.
- स्वाती बाकडे, औरंगाबाद आगर वाहतूक अधिकारी


हसनाबाद मुक्कामी बस दोन आठवड्यांपासून बंद झाल्याने शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी, परिसरातील ग्रामस्थांना औरंगाबादला उपचारासह इतर शासकीय कामांसाठी जावे लागते. बस अचानक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- शिवाजी सोळुंके.


औरंगाबादहून हसनाबाद मुक्कामी येणारी बस येत नसल्याने परिसरातील महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांची रात्रीच्या वेळेस गैरसोय होत आहे. बस त्वरीत सुरू करावी.
- अशोक नागवे, प्रवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com