बेकायदा घरांवर चालवा जेसीबी

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय पदभार घेतल्यापासून शहरात पाहणी करत आहेत. मात्र बेकायदा मालमत्तांना कर लागला नसल्याचा प्रकार सर्रासपणे त्यांना पाह्यला मिळत आहे. बुधवारी (ता. 18) त्यांना प्रभाग पाचमध्ये असाच प्रकार आढळून आला. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी शहरातील सर्व बेकायदा बांधकामांना आधी कर लावा. घरमालक कर भरत नसतील तर घरांवर जेसीबी चालवा, असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. 

आयुक्तांनी बुधवारी सकाळपासून प्रभाग पाचमध्ये पाहणी केली. त्यात आंबेडकरनगर, सिडको एन-9 अयोध्यानगर, सिडको एन-7 रेणुकामाता मंदिर, मिसारवाडी, आरतीनगर या भागात त्यांनी पाहणी केली. मिसारवाडीत त्यांना अनेक मालमत्तांचे विनापरवानगी बांधकाम झाल्याचे लक्षात आले. महापालिका बेकायदा मालमत्तांना डबल कर लावते. त्यामुळे या मालमत्तांना कर लागला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र कर आकारणी झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील बेकायदा बांधकामांना नियमानुसार कर लावा, त्यानंतर मालमत्ता कर वसूल करा. जे कर भरण्यास नकार देतील त्यांच्या घरांवर जेसीबी चालवा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी नगरसेविका ज्योती पिंजरकर, संगीता वाघुले, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, महेंद्र सोनवणे, कर संकलक व निर्धारक अधिकारी करणकुमार चव्हाण, उपायुक्त सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती. 

काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करा निलंबित 
शहरातील अनेक मालमत्तांना कर न लागल्याचे आयुक्तांच्या पाहणीत वारंवार समोर येत आहे. त्यात बेकायदा मालमत्तांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे आयुक्त बुधवारी चांगलेच भडकले. ज्या ज्या अधिकाऱ्यांवर कर आकारणीची जबाबदारी आहे, तसेच त्यांच्याप्रमाणे निष्क्रिय अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. 


 हे उघडून तर पहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’
मालमत्तांसाठी विद्यार्थ्यांची घेणार मदत 
शहरातील सर्व मालमत्तांची माहिती एकत्र करण्यासाठी अभियांत्रिकी, एमबीएमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे काम विद्यार्थ्यांकडून मोफत करून घ्यावे व त्यांना महापालिकेतर्फे अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com