जागोजागी खोदकाम, रस्त्यांवरील धूळीमुळे श्वसनाचे विकार वाढले

जागोजागी खोदकाम, रस्त्यांवरील धूळीमुळे श्वसनाचे विकार वाढले

फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव हामार्गाच्या रस्त्याचे कामे करण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट बुजवलेले खड्डे आणि मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून दररोज जाणाऱ्या येणाऱ्या शेकडो वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात या रस्त्यावर एका धोकादायक पद्धतीने पुलाचे काम सुरु आहे. या रत्यावर पाणी वापरल्या जात नसल्यामुळे वाहनांच्या रहदारीमुळे ग्रामीण रुग्णालयात धुळचधूळ जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचा गुत्तेदारावर वचक राहिला नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णांना धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरील ठिकाणी पाणी मारून काम करावे अशी मागणी होऊ लागली आहे.

औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे धोकादायक पद्धतीने काम सुरु असल्यामुळे या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे. धुळीमुळे वाहनचालकांसह परिसरात राहणारे नागरिक त्रस्त झाले असून डोळे आणि श्वसनाच्या विकारात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांशी हातमिळवणी केल्यामुळे संबधित गुत्तेदार मनात येईल तसे काम करीत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पत्राच्या सहायाने वळण रस्त्यावर धोकादायक पद्धतीने काम असुरू असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हवेतील आर्द्रता कमी झाल्यानंतर धूलिकण हलके होऊन त्यांचे हवेतील प्रमाण वाढत जात आहे. त्यासोबतच सध्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर जागोजागी खोदकाम करण्यात आलेले आहे. खोदकाम करताना रस्त्याच्या कडेलाच चार-पाच फुट खोल खोदकाम असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

वाहनांच्या वर्दळीसोबत ही धूळ नाकातोंडात 

औरंगाबाद- जळगाव रस्त्यांवरील खड्डे अर्धवट बुजवण्यात आलेले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम केलेले असल्यामुळे वेगाने जाणाऱ्या जड वाहनांसोबत ही धूळ हवेत मिसळते आहे. यातील फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालय परिसरात पुलाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या मधोमध दोरीच्या सहायाने वाहतूक व्यवस्था सुरु आहे. मात्र या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मुरुमावर पाणी टाकलेले नसल्यामुळे मोठ्या अवजड वाहनासह धूळ ग्रामीण रुग्णालय, डॉक्टरांच्या निवासी स्थानी जात असल्याने धुळीमुळे श्वसनाचा त्रास रुग्णासह डॉक्टरांना होऊ लागल आहे. एका बाजूनेच नव्याने कामे सुरू आहेत, तर काही कामांसाठी अनेक दिवसांपासून खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावली तर धुळीचे प्रमाण कमी होऊ शकते, असे नागरिकांनी म्हणने आहे.

वृक्षतोडीचे प्रमाण वाढले 

वृक्षलागवड करण्याकडेही दुर्लक्ष झाले. दुसरीकडे सध्या असलेली झाडे विकासकामांसाठी तोडली जात आहेत. रस्त्यासाठी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शिवाय शहरातही रस्त्याच्या कडेला दरवर्षी वृक्षलागवड करण्यात येते, मात्र त्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने जिथे वृक्षलागवड झाली तेथे आता केवळ खड्डे दिसून येत आहेत.  

धुळीमुळे  वाहन चालक  त्रस्त 

धुळीच्या समस्येचा सर्वाधिक त्रास फुलंब्री - औरंगाबाद जाणाऱ्या येणाऱ्याना मोठा सहन करावा लागतो आहे. जागोजागी रस्त्याचे खोदकाम केलेले असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. विकासाच्या नावावर रस्त्याची सुरु असलेल्या कामांमुळे अनेक निरपराधांना आपला जीव गमवावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांशी हात मिळवणी करून दुर्लक्ष करीत असल्याने गुत्तेदार मनमानी पद्धतीने आपले काम करीत आहे. रस्त्यावरील धूळ नाका-डोळ्यात जात असल्यामुळे हृदयाचे विकार वाढले आहे. रस्त्यामुळे होत असलेल्या अपघाताचा गुन्हा संबंधित गुत्तेदारावर व राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाच्या अधिकाऱ्यावर दाखल करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

धुळीची समस्या वाढत चालली असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. धूलिकणांमुळे वाहतूक चालक व ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत आहे. संबधित गुत्तेदारंनी पाणी मारून रस्त्याचे काम करावे.

- विजय देवमाळी, रुग्णवाहिका चालक 

श्वसनाद्वारे नाकातोंडातून धूळ शरीरात जाते. त्यामुळे तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधला तर हे टाळता येईल. हेल्मेट वापरणे हासुद्धा चांगला पर्याय आहे. शिवाय डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चष्मा, गॉगल्सचा वापर आवश्यक आहे. 

- डॉ.विलास विखे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com