नळकांडी पूल खचल्याने महामार्गावरील वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

निल्लोड (ता. सिल्लोड) परिसरात रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी (ता. दोन) बनकिन्होळा येथे औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील नाल्या टाकलेला नळकांडी पूल खचला. त्यामुळे महामार्ग बंद झाला.

निल्लोड (जि.औरंगाबाद ) : निल्लोड (ता. सिल्लोड) परिसरात रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी (ता. दोन) बनकिन्होळा येथे औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील नाल्या टाकलेला नळकांडी पूल खचला. त्यामुळे महामार्ग बंद झाला.

रस्त्याच्या कामाच्यावेळी येथे पुलाच्या दुरुस्तीसाठी बाजूचा रस्ता खोदून याठिकाणी पाईप टाकण्यात आले होते. त्यामुळे निम्मा रस्ता खचला असून, अखेर औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील खचलेल्या पुलाचा भाग आणखी खचल्याने या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. यावेळी पर्यायी रस्ता म्हणून औरंगाबाद-जळगाव या मार्गावरील वाहतूक आळंद गणपती फाट्यापासून सताळा-कायगाव-निल्लोडमार्गे निल्लोड फाटा अशी सुमारे दहा ते बारा किलोमीटरवरून वळविण्यात आली. यंदा पावसाळ्यातही पडला नाही असा पाऊस झाल्याने लहान मोठे नदी-नाले एक झाले. शेतकऱ्यांनी वाळवायला ठेवलेली मकाची कणसे पुन्हा भिजल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निल्लोड मंडळात शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad-Jalgaon Highway Closed