नेमका कुठून आला सिडकोत बिबट्या..! 

संकेत कुलकर्णी
बुधवार, 4 डिसेंबर 2019

औरंगाबाद : सिडको एन-एक या परिसराच्या जवळपास कुठेही वनक्षेत्र नाही. कोणत्याही प्रकारचे घनदाट झाडी-जंगल नाही. या भागात यापूर्वी बिबट्या आल्याची घटनाही कधी नोंदवली गेलेली नाही. जवळपास कोणताही नैसर्गिक निवारा नसताना बिबट्या सिडको परिसरात आला कसा, हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

औरंगाबाद : सिडको एन-एक या परिसराच्या जवळपास कुठेही वनक्षेत्र नाही. कोणत्याही प्रकारचे घनदाट झाडी-जंगल नाही. या भागात यापूर्वी बिबट्या आल्याची घटनाही कधी नोंदवली गेलेली नाही. जवळपास कोणताही नैसर्गिक निवारा नसताना बिबट्या सिडको परिसरात आला कसा, हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

No photo description available.

"शहरात आलेला बिबट्या हा अगदी तयार, वयात आलेला आणि कमी श्रमात शिकार करून जगणारा असाच होता. बिबट्या जंगलातच राहील असे काही नसते. उसाची दाट शेती हेदेखील त्याचे आता घर बनले आहे हे आपण आता लक्षात घ्यायला हवे,'' असे मत निवृत्त उपवन संरक्षक राजेंद्र धोंगडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. सकाळी बिबट्या प्रकरण उद्भवले, तेव्हा वॉकसाठी निघालेल्या श्री. धोंगडे यांना फोनवरून बातमी कळवण्यात आली. ते तडक त्या ठिकाणी आले आणि परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील मोहिमेसाठी मार्गदर्शन केले. 

Image may contain: 3 people, people sitting and outdoor

"बिबट्या जंगलातच राहतो, हे समीकरण आता राहिलेले नाही. त्याचे घर आता जंगलाबाहेरही त्याने बनवले आहे. मंगळवारी शहरातील एन-एक भागात आलेला बिबट्या हा सावंगी परिसरातून शहराकडे आला असावा,'' अशी शक्‍यता राजेंद्र धोंगडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - बायको आणि मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत त्याने काय केले?

सावंगी परिसरात जंगल आणि डोंगराळ भाग आहेच. त्यापासून खाली आलो, की हर्सूल भागात अनेक ठिकाणी उसाची शेती केली जाते. गुगलवर तपासणी केली, तर एन-एक परिसराच्या तीन बाजूला सहा ते दहा किलोमीटर अंतरावर डोंगररांग आहे. सावंगीमार्गे पिसादेवीकडून हा बिबट्या सिडको परिसरात आल्याची शक्‍यता दाट आहे, असे श्री. धोंगडे यांनी सांगितले. 

No photo description available.

वन अधिकारी म्हणतात शोध घेऊ

बिबट्या परिसरातील बदलांशी स्वतःला जुळवून घेतो. त्याची हीच क्षमता त्याला सिडको परिसरात घेऊन आल्याचा अंदाज विभागीय वन (दक्षता) अधिकारी आर. एम. सोनटक्के यांनी वर्तवला. 

"बिबट्याला शहराच्या परिसरात डुक्कर आणि कुत्री हे अन्न मिळते. त्यांच्या मागावर तो शहरात येऊ शकतो. शांत जागा मिळाली, तर तो कुठेही गुपचूप मुक्काम ठोकून राहतो. हे आपल्याला अनेकदा बोरिवली नॅशनल पार्क येथेही दिसले आहे. एन-एक परिसरालगत चिकलठाणा औद्योगिक वसाहत आहे. तिथे अनेक कंपन्या बंद आहेत. त्यापुढे नारेगाव, पळशी हे विरळ मनुष्यवस्ती असलेले काहीसे डोंगराळ भाग आहेत. याच परिसरातून अन्न शोधत तो इथपर्यंत आला असावा,'' असा अंदाज श्री. सोनटक्के यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Image may contain: one or more people and outdoor

पहा व्हिडिओ - असा पकडला बिबट्या

"सिडकोत आलेल्या जनावराचा नैसर्गिक अधिवास कोणता, ते नेमके सांगता येणार नाही. आपल्याकडे उसाची शेतीही नाही, की जिथे हा बिबट्या मुक्कामी असावा. वनविभाग त्याच्या वाटेचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल,'' असे सोनटक्के म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Leopard Rescue Operation in Cidco