शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याबरोबर मूलभूत सुविधांना अर्थसंकल्पात प्राधान्य  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढवण्याबरोबरच रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व पर्यटन या विषयांना वार्षिक अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या येत्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी सोमवारी (ता. ११) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. सभागृहात यावर चर्चा होण्यापूर्वी पदाधिकारी व आयुक्तांची यावर चर्चा झाली आहे. 

महानगरपालिकेचे २०१८-१९ चे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे सादर केले. अंदाजपत्रक मंजूर करण्यापूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अंदाजपत्रकात प्रामुख्याने उत्पन्न आणि खर्च या विषयावर चर्चा झाली. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. 

शहरातील सर्वसामान्य जनतेला केंद्रिभूत मानून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाणी, रस्ते, पथदिवे, स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी आयुक्तांकडे आरोग्य, शिक्षण, पर्यटन या विभागाला अर्थसंकल्पात भरीव तरतूद ठेवण्यात यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी महापौर घोडेले यांना आरोग्य, शिक्षण, पर्यटन या विभागाला तरतूद करण्याबद्दल पत्र दिले आहे.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, की याविषयी आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी मूलभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच पथदिवे, दुभाजक, चौकांचे सुशोभीकरण, स्वच्छता या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुखांचे शिल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे नूतनीकरण, विद्यापीठ परिसरातील बुद्धलेणीचा विकास या कामांना गती देऊन प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आयुक्तांना सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

Web Title: aurangabad mahanagar palika Infrastructure budget priority