पतंगाच्या मांजाने चिरला गळा 

Ramesh Yadav
Ramesh Yadav

औरंगाबाद - दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजाचा गळ्याला फास पडून शासकीय महाविद्यालयातील कर्मचारी जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. सहा) सायंकाळी हर्षनगर भागात घडली. 

शहरात नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांना मोठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. कुणाच्या वाहनाच्या, सायकलच्या चाकात मांजा अडकत आहे, तर कधी गळ्याला फास बसत आहे. वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गळ्याला, हाताला मांजाने कापून काढल्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी रमेश यादव हे बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून महाविद्यालयातून घरी जात होते. हर्षनगर-शहागंजमार्गे जात असताना अचानक आकाशात कापल्या गेलेल्या पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याशी अडकला आणि क्षणात त्याचा फास बसला. जखमी अवस्थेतच दुचाकी थांबवून मांजाचा फास सोडविण्याच्या प्रयत्नात चक्कर येऊन पडलेल्या रमेश यादव यांना नागरिकांनी सावरले. प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. 

संक्रांतीपासून शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री सर्रास होत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नायलॉन मांजावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर काहीही कारवाई झालेली दिसत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com