सतर्क चालकामुळे वाचले 42 जीव; अजिंठा लेणीत बसचा टायर रॉड तुटला..

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत बसच्या टायरचा रॉड निखळल्याने पडलेला टायर व उभी असलेली बस छायाचित्रात दिसत आहे. 
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत बसच्या टायरचा रॉड निखळल्याने पडलेला टायर व उभी असलेली बस छायाचित्रात दिसत आहे. 

जरंडी : बसच्या टायरचा अचानक रॉड तुटून अनियंत्रित झालेल्या बसमधील ४२ पर्यटकांचे चालकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचल्याची घटना अजिंठा लेणी परिसरात रविवारी (ता. २०) कालिका माता मंदिराजवळ घडली. या घटनेमुळे अजिंठा लेणी प्रकाश झोतात आली आहे. 

सोयगाव आगाराच्या बसेस जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतून पर्यटकांना ने-आण करतात, परंतु या बसेस खटारा झाल्यातरीही उत्पन्न वाढीच्या नावाखाली या बसेसची सोयगाव आगराकडून देखभाल केली जात नसल्याचा आरोप हर्षवर्धन जगताप यांनी केला आहे. रविवारी ता. २० सायंकाळी अजिंठा लेणीतून निघालेली पर्यटकांची बस (क्र-एम-एच२० बीएल३२८०) कालिका माता मंदिराजवळ आली असता, टायरचा स्टेअरिंग रॉड तुटुन बस अनियंत्रित झाली बसमधील ४२ पर्यटकांचे प्राण चालकाच्या प्रसंगावधानाने वाचल्याने विदेशी पर्यटकांनीही सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान, सोयगाव आगाराच्या मनमानी कारभार अजिंठा लेणीतील बससेवेतून दिसून आला आहे. सोयगाव आगाराचे चालक सुरवाडे यांनी सतर्कता दाखविली नसती तर विदेशी पर्यटकांचे जीव धोक्यात आले असते, अशी चर्चा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात रंगू लागली होती. दरम्यान सोमवारी (ता. २१) अजिंठा लेणी बंद असल्याने मिळालेल्या वेळात या बसेसची देखभालीचे काम करण्याची मागणी जोर धरून होती. दरम्यान घटनेनंतर चालकाने बस रस्त्याच्या कडेवर थांबवून बस मधील ४२ पर्यटकांना सुरक्षित खाली उतरवले, दरम्यान रविवारी अजिंठालेणी हाऊसफुल्ल झालेली असतांना ही सोयगाव आगाराने अजिंठालेणीत खटारा बसेस चालवून केवळ उत्पन्न वाढीचा प्रयत्न केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. 

घटनेनंतर लगेचच फर्दापूर टि. पॉइंट वरुन पर्यटकांना अजिंठालेणीत घेवुन जाणाऱ्या बस (एमएच 0६ एस ८५१६ )मध्ये तांत्रिक बिघाड होवुन मध्येच बंद पडल्याने पर्यटकांना भरपावसात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. एकाच दिवसात सोयगाव आगाराच्या ८ बस पैकी दोन बसेस मध्ये बिघाड झाल्याने केवळ सहा बसेस विदेशी पर्यटकांच्या सेवेत परिवहन विभागाने ठेवल्याने मोठा गोंधळ उडाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com