औरंगाबादेत ऑडिटरची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

औरंगाबादेत ऑडिटरची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

औरंगाबाद : औरंगाबादेत सहकार विभागातील ऑडिटरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सकाळी नऊच्या सुमारास उघड झाली.

पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी माहिती दिली की, सुधाकर अभिमन्यू मुंडे (रा, सह्याद्री हिल्स, शिवाजीनगर, औरंगाबाद) असे ऑडिटरचे नाव आहे. ते सहकार विभागात विशेष लेखापरीक्षक होते.

सकाळी नऊच्या सुमारास सुधाकर मुंडे सकाळी नऊच्या सुमारास हॉलमध्ये होते. त्यावेळी पत्नी व इतर सदस्य दुसऱ्या खोलीत होते. मुंडे यांनी त्यांचा खासगी पिस्तूल काढला व स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब पाहून कुटुंबीय हादरले. दरम्यान, पुंडलिकनगर ठाण्याचे  पोलिस निरिक्षक अशोक मुदिराज, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात व पथक घटनास्थळी पोचले. मुंडे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com