महावितरणच्या लिपिकास लाच घेताना पकडले रंगेहाथ

संजय जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कर्मचाऱ्याचे थकीत वेतन काढण्यासाठी रामकर याने 30 हजाराची लाच मागितली होती.

कन्नड : शहरातील हिवरखेडा रस्त्यालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत लिपिकास दहा हजारांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 05) रंगेहाथ पकडले. भगवान सुदाम रामकर (वय 40 वर्षे) हे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे.

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, संबंधित विभागात कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. याच कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याचे थकीत वेतन काढण्यासाठी रामकर याने 30 हजाराची लाच मागितली होती. एप्रिल महिन्याचा पगार काढन्यासाठी दहा हजार तर सी.पी.एफ.प्रस्ताव अपलोड करण्यासाठी 20 हजार असे तीस हजार रुपाये देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून 10 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारतांना त्यास रंगेहाथ पकडले.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपविभागीय अधिकारी चौधरी,पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathi news bribery caught