मुंबईला जाणारे जेटचे विमान रद्द; 90 प्रवासी माघारी

प्रकाश बनकर
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईहून येणारे जेट एअरवेज विमान औरंगाबादेत आले नाही. यामुळे औरंगाबादेतून सकाळी 6.50 वाजता जाणारे विमान रद्द करावे लागले.

मुंबईला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर आलेल्या 90 प्रवाशांना सकाळी माघारी फिरावे लागले. यातील काही प्रवाशांनी रिफंड घेतले तर काही गुरुवारी सकाळच्या विमानाने जाणार असल्याची माहिती जेटचे स्वामिनाथन यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

सोमवार, मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मुंबई ठप्प झाली आहे. वाहतूक सेवांबरोबर हवाई सेवांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती आंतराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाण रद्द झाली आहेत. विमानतळावर अनेक कंपन्यांचे पायलट अडकून पडले आहेत. मुंबईहून औरंगाबादला येणारे जेट एअरवेजचे जी-डब्ल्यू 313 हे विमान पावासामुळे आलेच नाही.

यामुळे औरंगाबादेतून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना माघारी फिरावे लागले जेटतर्फे प्रवाशांचा याची माहिती देण्यात आली. 90 प्रवाशांपैकी काही प्रवाशांना रिफंड देण्यात आले तर काही लोकांना चारचाकी वाहनाने मुंबईकडे पाठविण्यात आले. काही प्रवाशी गुरुवारी सकाळच्या जेटच्या विमानाने मुंबईला जाणार आहेत. असेही जेटचे स्वामिनाथन यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: aurangabad marathi news jet cancels flight to mumbai