विभागीय उपनिबंधकांना शिवसेना नेत्यांचा दोन तास घेराव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी 

औरंगाबाद : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी मंगळवार (ता.22) रोजी औरंगाबादेत विभागीय निबंधक कार्यालयात दीड ते दोन तास अधिकाऱ्यांना घेराव घातला. 

आधार सर्वरच्या तांत्रीक दोषामुळे कर्जमाफीसाठीचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रीया कासवगतीने सुरू आहे. 1 लाख 62 हजार 381 थकबाकीदारांपैकी जिल्ह्यात 59 हजार 98 शेतकऱ्यांचेच अर्ज दाखल होऊ शकले आहेत. शिवसेनेतर्फे कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी विभागीय निबंधक कार्यालयावर शिष्टमंडळ धडकले.

दीड दोन तास अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदींसह शिवसैनिक व शेतकरी आले होते. बुधवारी जिल्ह्यातील सुविधा केंद्रांना शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी भेटी देणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

Web Title: aurangabad marathi news loan waiver applications gherao