कृषी आयुक्तांनी पायी गाठला डोंगर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर पदभार घेतल्यानंतर मंगळवारी प्रथमच औरंगाबाद दौऱ्यावर आले.

औरंगाबाद - राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर पदभार घेतल्यानंतर मंगळवारी प्रथमच औरंगाबाद दौऱ्यावर आले.

अधिकाऱ्यांनी त्यांचा दौरा निश्‍चित केला; मात्र केंद्रेकर यांनी नियोजित नाही, तर वेगळ्याच ठिकाणी पाहणी करण्याची सूचना केली, "मात्र साहेब त्या ठिकाणी गाडी जात नाही,' असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर क्षणाचाही विलंब न करता, काढा दुचाकी म्हणत दोन किलोमीटर दुचाकीने, तर एक किलोमीटर पायी चालून केंद्रेकर यांनी खुलताबाद तालुक्‍यातील गोळेगाव येथील डोंगर गाठले.

केंद्रेकर यांनी तेथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. केवळ पाहणीच केली नाही, तर आपण अभियांत्रिकी शाखेचे असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या अचानक भेटीने अधिकारीच नाही, तर शेतकरीही अवाक्‌ झाले. केंद्रेकर यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद गाठले. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून गोळेगाव येथे "उन्नत शेती समृद्ध शेतकरी' अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

Web Title: aurangabad marathwada agricultural commissioner reached the hill