मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावा : रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे आपल्या कार्यकाळात मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावावेत
 मराठवाडा जनता विकास परिषद
मराठवाडा जनता विकास परिषदsakal

लातूर : देशाच्या इतिहासात ७० वर्षांनंतर प्रथमच रेल्वे राज्यमंत्री पद हे मराठवाड्याला मिळाले आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे आपल्या कार्यकाळात मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी येथील मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

रेल्वे राज्यमंत्री म्हणून ता. २० ऑक्टोबरला औरंगाबाद येथे मराठवाड्यातील सर्व खासदार, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या रेल्वे विकासाच्या मागण्यावर सहानुभूतीने विचार करावा. मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेत समावेश करावा, मराठवाड्यातून २०१९-२० पूर्वीच्या रेल्वे सेवा सुरू कराव्यात, विशेष सेवा म्हणून तिकीट वाढवू नयेत, मराठवाड्यातील मंजूर झालेले लातूररोड-अहमदपूर- लोहा-नांदेड, लातूर-निलंगा- उमरगा- गुलबर्गा, उस्मानाबाद -तुळजापूर-सोलापूर, लातूर रोड-जळकोट-बोधन, लातूर-रेणापूर-पानगाव या नवीन रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करावे, मराठवाड्यातील सर्वं स्टेशन वरील प्लॅटफार्म ५०० मीटर लांबीचे करावे, औरंगाबाद ते दिल्ली नवीन रेल्वे सेवा सुरू करावी, हिंगोली-मुबंई नवीन रेल्वे सेवा सुरू करावी, पूर्णा ते गोवा त्रिंवेद्रम नवीन रेल्वे सेवा सुरू करावी, शिर्डी-औरंगाबाद-जालना-परभणी-उदगीर मार्गे तिरुपती गाडी सुरू करावी, पंढरपूर-लातूर मार्गे तिरुपती गाडी सुरू करावी, लातूर ते पुणे सकाळी इंटरसीटी सुरु करावी, मराठवाड्यातील सर्व रेल्वे मार्ग दोन पदरी करून त्याचे विद्युतीतीकरण करावे, अकोला-मिरज जवळपास ७०० किलोमीटरच्या मार्गावर फक्त दोन गाड्या चालत होत्या. या मार्गाचा वापर करावा, लातूर स्टेशनवर पिटलाइन मंजूर आहे ती लवकर होण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 मराठवाडा जनता विकास परिषद
अंबाजोगाई : ५,३६४ मीटर पायी चढाई करत सर केला एव्हरेस्टचा बेस कॅम्प

मराठवाड्यातील पूर्णा येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. येथे एक मोठे लोको शेड आहे त्याचा वापर विजेवर चालणाऱ्या इंजिनसाठी करावा. लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पास आर्थिक तरतूद करावी व प्रकल्प सुरु करावा, लातूर-लातूर रोड दरम्यान घरणी वडवळ लूप लाइन मंजूर आहे ते काम त्वरित सुरू करावे, लातूर रेल्वे स्टेशन वरून माल वाहतूकमधून दरवर्षी जवळपास १५० कोटी रुपये उत्पन्न रेल्वेस मिळते उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम त्या स्टेशनवर खर्च करण्याचे बोर्डाचे नियम आहेत त्यानुसार लातूर स्टेशनवर ४०० मीटर लांबीचे माल ठेवण्यासाठी शेड उभा करावा, लातूर स्टेशन वर ३०० ट्रकसाठी ट्रमिनल तयार करावे, जालना येथे ड्राय पोर्टचे काम चालू आहे त्यासाठी जालना रेल्वे स्टेशनवर ५०० ट्रकसाठी ट्रमिनलचे काम सुरू करावे आदी मागण्या श्री. नरहरे यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com