औरंगाबादच्या कंपनीची बावीस लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

औरंगाबाद - तमिळनाडूतील दोघांनी शहरातील एका कंपनीला कापसाच्या गाठींची ऑर्डर दिली. त्यानंतर कंपनीने पाठविलेल्या कापसाच्या शंभर गाठींची परस्पर विल्हेवाट लावून तब्बल बावीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (ता. २६) गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - विनीत सुरेशकुमार तायल (रा. सिडको एन-४) यांची श्री शंकर कॉटन कार्पोरेशन ही कापसाच्या खरेदी-विक्रीची कंपनी आहे. त्यांना शुक्रवारी (ता. २३) तमिळनाडू येथील कौशल नावाच्या व्यक्‍तीने फोन केला. राघवेंद्र टेक्‍स्टाईल्स व व्हनिला टेक्‍स्टाईल या कंपनीसाठी त्या व्यक्तीने शंभर कापसाच्या गाठीची ऑर्डर दिली. शिवाय तिने ईमेल पाठवून ऑर्डर पक्कीही केली. त्यानुसार तायल यांनी नांदेडच्या चित्तूर ट्रान्स्पोर्टमार्फत २१ लाख ९१ रुपयांच्या शंभर कापसाच्या गाठीचा माल तमिळनाडूतील कोयंबतूर येथील व्हनिला टेक्‍स्टाईल या कंपनीला पाठवला. मात्र, माल पोचवल्यानंतर तो माल व्हनिला कंपनीला न उतरवता अरुलमुर्गन या दुसऱ्याच कंपनीला विकण्यात आला. विशेष म्हणजे सर्व व्यवहार विश्‍वासावर होता; मात्र माल पोचल्यानंतर मालाचे पैसे दिलेच नाही. उलट पैसे मिळणार नाही, असे सांगत दम देण्यात आला. त्यामुळे तायल यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मधुकर बारगळ करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news 22 lakh rupees cheating