‘ऑरिक’मध्ये होणार २२० केव्हीचे सबस्टेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये २२० केव्ही क्षमतेचे पॉवर हाऊस उभारण्यासाठी लागणारी जागा औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपच्या बैठकीत हस्तांतरित करण्यात आली. शेंद्रा आणि बिडकीन येथील औद्योगिक शहरांना वीज प्राप्त करून देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या सबस्टेशनसाठी ऑरिकने १४ हजार ५५५ (३.५९ एकर) चौरस मीटरचा भूखंड नुकताच वितरित केला आहे. 

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये २२० केव्ही क्षमतेचे पॉवर हाऊस उभारण्यासाठी लागणारी जागा औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपच्या बैठकीत हस्तांतरित करण्यात आली. शेंद्रा आणि बिडकीन येथील औद्योगिक शहरांना वीज प्राप्त करून देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या सबस्टेशनसाठी ऑरिकने १४ हजार ५५५ (३.५९ एकर) चौरस मीटरचा भूखंड नुकताच वितरित केला आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन येथील उद्योग आणि रहिवासी वसाहतींना वीज उपलब्ध करून देण्यासाठी ऑरिकमध्ये (शेंद्रा) २२० केव्ही क्षमतेचे सबस्टेशन उभारले जाणार आहे. या सबस्टेशनसाठी लागणारी जागा वितरित करण्याचा निर्णय औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड (एआयटीएल)च्या वतीने आयोजित बैठकीत बुधवारी (ता. एक) घेण्यात आला. ऑरिकने ही जागा महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिस्सिटी ट्रान्समिशन कंपनी अर्थात महाट्रान्सकॉमला देण्यात आली आहे. ३.५९ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सबस्टेशनपर्यंत वीज आणून दिली जाणार आहे. पुढे उद्योगांना आणि रहिवासी क्षेत्रास वीज वितरण करण्यासाठीच्या परवानगीकरिता एआयटीएल प्रयत्नशील आहे. ही जागा जालना रस्त्यालगत देण्यात आली असून त्यासाठी ८०० रुपये प्रतिचौरस मीटर एवढा दर निश्‍चित करण्यात आला. 

यासाठी एआयटीएलचे महाव्यवस्थापक विक्रम कुमार, सह सरव्यवस्थापक गजानन पाटील, सीएफओ प्रफुल्ल वाणी, रमेश कोडुरी यांची उपस्थिती होती.  विद्युत विभागाच्या वतीने अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी  झाले  होते. 

महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनीच्या २२० केव्ही सबस्टेशन उभारणीसाठी १४ हजार ५५५ चौरस मीटरचा भूखंड वितरित करण्यात आला आहे. एका व्यावसायिक प्लॉटची प्रक्रिया पूर्ण करून त्याचेही वितरण करण्यात आले. 
- गजानन पाटील (सह सरव्यवस्थापक, एआयटीएल)

एका व्यावसायिक प्लॉटचे वितरण 
ऑरिकमधील दोन व्यावसायिक भूखंडांच्या लिलावासाठी ऑगस्ट महिन्यापासून निविदा प्रक्रिया सुरू होती. एकदा तारीख वाढविण्यात आली तर नंतर परदेशवारी असल्याने ही प्रक्रिया पुढे सरकली होती. त्यातही एकाच प्लॉटसाठी दोन जणांनी प्रस्ताव सादर केले होते. एक नंबर सेक्‍टरमधील २० नंबरचा प्लॉट रेस्टॉरंट असलेल्या संस्थेच्या नावे वितरित करण्यात आला. यासाठी मूळ दर ४८०० रुपयांचा निश्‍चित केलेला असताना या संस्थेने ५३००.४४ रुपये प्रतिचौरस मीटर एवढ्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. 

Web Title: aurangabad marathwada news 220 kv substation in aurid